केज तालुक्यातील देवस्थानच्या विकास कामासाठी ६० लाखाचा निधी मंजूर…..!
केज दि.११ – तालुक्यातील उत्तरेश्वर पिपरी, वरपगाव, आरणगाव, युसुफवडगाव येथील देवस्थानच्या मिटिंग हॉल, सभागृह, पेव्हर ब्लॉक आणि सभा मंडपाचे बांधकामासाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यटन मंत्र्यांकडून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यासाठी भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.
केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील श्री क्षेत्र उत्तरेश्वर मंदिर संस्थानसाठी मिटिंग हॉल व पेव्हर ब्लॉक, वरपगाव येथील श्री क्षेत्र साधू शिवरामपुरी मठ संस्थानसाठी सभागृह व पेव्हर ब्लॉक, आरणगाव येथील श्री क्षेत्र गिरीजा शंकर मंदिर संस्थानसाठी मिटिंग हॉल तर युसुफवडगाव येथील श्री क्षेत्र परांडकर महाराज मठ संस्थानसाठी सभामंडपाचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करीत भाजपचे युवानेते विष्णू घुले यांनी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता
माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी उत्तरेश्वर पिंपरी येथील श्री क्षेत्र उत्तरेश्वर मंदिर संस्थानसाठी मिटिंग हॉल बांधकामासाठी १० लाख रुपयांचा तर पेव्हर ब्लॉक कामासाठी १० लाख रुपयांचा, वरपगाव येथील श्री क्षेत्र साधू शिवरामपुरी मठ संस्थानसाठी सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपयांचा तर पेव्हर ब्लॉक कामासाठी १० लाख रुपयांचा, आरणगाव येथील श्री क्षेत्र गिरीजा शंकर मंदिर संस्थानसाठी मिटिंग हॉल बांधकामासाठी १० लाख रुपयांचा तर युसुफवडगाव येथील श्री क्षेत्र परांडकर महाराज मठ संस्थानसाठी सभामंडपाच्या बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंजुर करून आणला आहे. युवानेते विष्णू घुले यांच्या पाठपुराव्यास यश आले असून निधी मंजूर करून दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे विष्णू घुले यांच्यासह या गावातील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
—————-
आडस, जोला येथील देवस्थानसाठी ३० लाख मंजूर
आडस येथील परकुट गल्लीतील हनुमान मंदिराच्या सभामंडप कामासाठी २० लाख रुपयांचा तर जोला येथील खंडोबा मंदिरच्या सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यटन मंत्र्यांकडून मंजूर करून घेतला आहे.