शेती
अनिल सूर्यवंशी राष्ट्रीय ऍग्रोकेअर आयडॉल पुरस्काराने सन्मानित….!
छत्रपती संभाजी नगर दि.१३ – शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य करून शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती व्हावी या उद्देशाने धडपडणाऱ्या अनिल शांताराम सुर्यवंशी (मु.पो.बळहेगाव ता.वैजापूर जि.छ.संभाजीनगर) यांना ऍग्रो कृषी मंचने राष्ट्रीय ऍग्रो आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अनिल सुर्यवंशी मागील वर्षांपासून सेंद्रीय शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणे, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीशाळेत विचारून त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे, तालुक्यातील इतर गटांना लागेल ते सहकार्य करणे तसेच दुसर्या तालुक्यातील गटांना दशपर्णी व जिवामृत बनवण्यास मदत करणे.
त्याचबरोबर गाजर गवतावरील मित्र किड झायलोग्रामा ह्याच संवर्धन करत आहेत. मध्यप्रदेश मध्ये जाऊन तेथील स्थानिक शेतकऱ्यांना दशपर्णी बनवण्यास मदत करुन त्याचे महत्त्व पटवून सांगीतले.आणि आपल्या व दुसर्याच्या शेतातील किडीचे निरीक्षण करून फोटो काढणे व ते फोटो शास्त्रज्ञांना शेतीशाळेत दाखवुन ते किड मित्र किड आहे कि शत्रु किड याची ओळख करून त्यावर जैविक औषध फवारावे कि रासायनिक औषध फवारावे हे सांगणे. गटाची आत्मात नोंद करून विविध योजनांची माहिती गटाला देणे, कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना गटाबददल माहिती देणे. विद्यापीठात जाऊन शास्त्रज्ञांच्या भेटी घेऊन पिकांवर चर्चा करणे, पिक पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञांना थेट शेताच्या बांधावर आमंत्रित करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे व जैविक किड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची माहिती देण्यासाठी साक्रीहुन अरिफ सर यांना शेतकऱ्यांच्या बांधावर बोलवून त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सेंद्रीय शेतीबद्दल गावोगावी जाऊन तेथील शेतकऱ्यांना माहिती देणे इत्यादी उपयुक्त कार्य सूर्यवंशी करत आहेत.आणि याचीच दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.