आपला जिल्हा
राज्यात दहा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…..!
केज दि.१५ – आयपीएस अधिकारी कमलेश मीना यांची केजचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून एएसपी पंकज कुमावत यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
मागच्या दोन वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी रुजू झाल्यापासूनच बीड जिल्ह्यातच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका लावत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले. मटका, जुगार, परराज्यातून येणारा गुटखा, बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर धडक कारवाई करून कित्येक गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्या या धडाकेबाज कारवायांमुळे बीड जिल्ह्यात गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. तर सर्वसामान्य नागरिक मात्र पंकज कुमावत यांचे भरभरून कौतुक करत होते. मागच्या काही दिवसांपूर्वीही त्यांची आंबेजोगाईला बदली झाली म्हणून आदेश आले होते. परंतु ते त्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. मात्र आता केज उपविभागीय अधिकारी पदावर आयपीएस असलेले कमलेश मीना यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांनी जरी सुटकेचा विश्वास सोडलेला असला तरी मात्र पंकज कुमावत यांचे बदलीचे आदेश आणखी आलेले नाहीत.
दरम्यान, केज उपविभागाला शिस्त लावण्याचे आणि गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करण्याचे काम पंकज कुमावत यांनी केले. त्याचबरोबर केजच्या अतिक्रमणाचा प्रश्नही त्यांच्याच संरक्षणामध्ये निर्विघ्नपणे पार पडला. त्यामुळे हैदराबाद येथे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेले आणि केजला नियुक्त झालेले कमलेश मीना यांनीही पंकज कुमावतांसारख्याच धडाकेबाज कारवाया कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.