ब्रेकिंग
मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता….!
बीड दि.१० – शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधिमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महा निकालाचे वाचन करत आहेत. मात्र आतापर्यंत झालेल्या वाचनामध्ये मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल समोर आल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र शिंदे गटासह ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवण्यात आले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधिमंडळामध्ये निकालाचे वाचन करत आहेत. यामध्ये अतिशय सूक्ष्म निरीक्षणे यामध्ये नोंदवल्या गेली असून शिवसेनेची जी घटना आहे ती 2018 ची अमान्य करत 1999 च्या घटनेलाच राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिलेली आहे. तर शिवसेनेच्या घटनेनुसारच एकनाथ शिंदे यांना एकटे पक्षप्रमुख हे अपात्र ठरवु शकत नाहीत. तर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय या बाबतीत घेऊ शकतो आणि तोच अंतिम असेल असेही म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे प्रतोद म्हणून जे भरत गोगावले यांची निवड केली ती या निकालामध्ये मान्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटालाच मान्यता दिलेली आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे नार्वेकरांच्या निकालामध्ये ठाकरे गटाचे बहुतांश मुद्दे खोडुन काढण्यात आले आहेत.
दरम्यान, सदरील निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडणार असली तरी मुख्यमंत्री शिंदे हेच पक्ष प्रमुख आणि शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 16 आमदार व ठाकरे गटाचे 14 ही आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत.सदरील निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटणार असून राष्ट्रवादी पक्षा बाबतही काय घडते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.