क्रीडा व मनोरंजन
पुरुषोत्तमदादा सोनवणे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना सुवर्णपदक….!
केज दि.१२ – नेपाळमध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत पुरुषोत्तमदादा सोनवणे महाविद्यालयाच्या भाग्यश्री संतोष सिरसट व नेहा श्याम सिरसट यांनी आपलेकसब दाखवत घवघवीत यश संपादन केले.
तालुक्यातील सारणी (आ.) येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी १५ व्या नेपाळ शोलोकन कराटे असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये खुल्या गटातून भाग्यश्री सिरसट हिने खेळाची चमक दाखवून सुवर्णपदकाची कमाई केली. तर नेहा श्याम शिरसाट हिने ५० किलो वजन गटामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
दरम्यान दोन्ही विद्यार्थिनींनी पुरुषोत्तमदादा सोनवणे कॉलेजचे तसेच भारतीय संघाचे नाव नेपाळमध्ये गाजवले. सदरील खेळाडूंना प्रा. राम नेमटे, अनिल ठोंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदरील यशाबद्दल बद्दल संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, प्राचार्य पी.एच.लोमटे, क्रीडा शिक्षक एल.आर. पाटील यांच्यासह शिक्षकवृंदानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.