#Social
जनाबाई काकडे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित….!
केज दि.२ – तालुक्यातील साबला गावचे सरपंच, नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या, स्वतःला झोकून देवून समाजकार्य करणाऱ्या आदर्श सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांना राजर्षी शाहू प्रतिष्ठान चा महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गावात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे , शैक्षणिक कार्यक्रम घेणे “, गाव माझा मी गावाचा ” याप्रमाणे गावात प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान राबवणे तसेच , राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करणे. गावातील सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे , लहान मुलांना, मुलींच्या मनामध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण करणे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबऊन एक आदर्श सरपंच म्हणून ज्यांनी अल्पावधीतच एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
केज तालुक्यातील साबला या गावाची ओळख अगदी राज्याच्या पटलावर करून बीड जिल्हयातील एक आदर्श महिला सरपंच म्हणून ज्यांनी नाव लौकीक मिळवला अशा सरपंच जनाबाई काकडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच “राजर्षी शाहू प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ” महाराष्ट्र आयडॉल ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुणे – दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य , राजर्षी शाहू महाराज ” महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ ” या कार्यक्रमात या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुरलीधर (अण्णा ) मोहोळ ( केंद्रिय हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री भारत सरकार ) व मा. शिवानी नाईक, मराठी अभिनेत्री ( अप्पी आमची कलेक्टर ), आयोजक मा. भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर ( संस्थापक अध्यक्ष – राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण / संपादक , जागृत शोध ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा काकडे, ज्ञानेश्वर पांचाळ तसेच आदर्श शिक्षक नरहरी काकडे , पोपट काकडे, तानाजी आंडिल, हनुमंत परळकर, बालाजी जाधव , पुजा पांचाळ, स्वप्नाली जाधव, रूपाली परळकर, अनुराधा आंडिल तसेच साबला ग्रामपंयतचे सर्व पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.