#Social

‘महिला सुरक्षितता’ संदर्भात उद्या कार्यशाळा…!

10 / 100
छत्रपती संभाजीनगर, दि.१७ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने ’महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ संदर्भात येत्या शुक्रवारी (दि.२०) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
                    या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या नाटयगृहात शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० ते ५ या दरम्यान कार्यशाळा होणार आहे. तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ, अभ्यासक अ‍ॅड.अर्जना गोंधळेकर व सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून डॉ.पुष्पा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
              संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाप्रमुख तसेच विद्यापीठातील विभागप्रमुखांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.रणजितसिंग निंबाळकर यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close