#Social
राष्ट्रीय विचारांचे न्यायिक अधिष्ठान म्हणजे दीनदयाळ – प्राचार्य सुहास मोराळे…!
फुलंब्री, दि.२५ – पंडित दीनदयाळ हे वक्ता, पत्रकार, राष्ट्रीय नेता व राष्ट्रीय विचारांचे न्यायिक अधिष्ठान असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी “एकात्म मानवदर्शन” हा विचार मांडला, असे प्राचार्य डॉ.सुहास मोराळे यांनी केले .
श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव येथील प्राचार्य डॉ. सुहास मोराळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर. टकले होते. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. डॉ. महेश थोरात यांनी करून दिला. कर्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पांडुरंग कल्याणकर यांनी केले. या कार्यक्रमात शिवानी जाधव, पायल तावरे या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ यांच्या जीवनाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. सुहास मोराळे म्हणाले की, पंडित दीनदयाळ हे वक्ता, पत्रकार, राष्ट्रीय नेता असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी “एकात्म मानवदर्शन” हा विचार मांडला. त्यात शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे एकत्र रूप म्हणजे मानव अशी संकल्पना मांडून व्यक्ती ही सृष्टी, समष्टी व परमेष्ठीशी जोडलेली आहे. असा विचार पंडितजींनी दिला. त्यांचा हा विचार मानवी कल्याणाचा असल्याने इतर राजकीय पक्षातील लोक सुद्धा मान्य करीत. समाज व व्यक्ती यांच्याबद्दल चिंतन असणारे व्यक्तिमत्त्व असल्याने मानवता हा महत्त्वाचा विचार घेऊन दीनदयाळजींनी राष्ट्रासाठी कार्य केले आहे. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सपंर्क आला. आणि त्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. भारतीय जनसंघाच्या रूपाने राष्ट्रहिताचा विचार करणारा राजकीय पक्षाच्या संघटन उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानी जनसंघाचे प्रदेश मंत्री, महामंत्री व पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सामान्य माणसांबद्दल हितावह भूमिकेला महत्त्वाचें स्थान दिलेलं दिसून येते. म्हणून सामाजिक विचारांचे न्यायिक अधिष्ठान असणारं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. असे मत डॉ. सुहास मोराळे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार कु. कावेरी तावडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल तावरे हिने केले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रा. डॉ. पांडुरंग कल्याणकर, डॉ. राजश्री पवार, डॉ. मंजुषा नळगीरकर, प्रा. विजय पांडे, प्रा. डॉ. दत्तात्रये येडले, प्रा. डॉ. सुरेश मुंढे, डॉ. संजीवकुमार पांचाळ, डॉ. अश्विन रांजणीकर, डॉ. महेश थोरात, प्रा. डॉ. नितीन माळेगावकर, प्रा. डॉ. संदीप जगताप, डॉ. गणेश कुलकर्णी,
प्रा. डॉ. दिनेश कचकुरे, श्री. दयानंद कांबळे, श्री. बाबासाहेब दाभाडे, श्री प्रेम चव्हाण, श्री. विनोद तुपे, श्री. रमेश जगधने, श्री. जयराम जाधव, श्री रत्नाकर जाधव, श्री अजिनाथ पेरकर व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.