#Social
खेळ रंगला…. ”केज स्मार्ट श्रीमती”……!
केज दि.९ – केज रोटरी तर्फे दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त घेतल्या जाणाऱ्या “केज स्मार्ट श्रीमती” स्पर्धेत केजच्या रेश्मा जीवन बांगर यांनी प्रथम क्रमांक मिळवून “केज स्मार्ट श्रीमती” बनण्याचा बहुमान मिळवला तर सुनीता संतोष राऊत यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज डायरेक्टर रवींद्र बनकर, रो किशोर दाताळ, केज रोटरी अध्यक्ष प्रकाश कामाजी, हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, अरुण अंजाण, दादाराव जमाले पाटील सुशील टोपे व नगराध्यक्षा सीता बनसोड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
रोटरी क्लब ऑफ केज आणि भवानी माता उत्सव समितीच्या वतीने ही स्पर्धा मंगळवारी भवानी मंदिर प्रांगणात पार पडली. या स्पर्धेत विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 200 महिलांनी सहभाग नोंदवला होता. निवडफेरी सह इतर चार फेऱ्यानंतर अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत 20 पैकी 19 गुण मिळवून रेश्मा जीवन बांगर या प्रथम स्थानी आल्या तर सुनीता संतोष राऊत या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
या स्पर्धेत केजची मयुरी संतोष राऊत या केजच्या कन्येने आपल्या नोकरीच्या पहिल्या पगारातून पहिल्या चार विजेत्यांना चार पैठणी भेट दिल्या. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. हनुमंत भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रकाश कामाजी यांच्यासह रो. अरुण अंजाण, दादाराव जमाले, प्रवीण देशपांडे, सूर्यकांत चवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.