#Crime
बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून वाहन चोरी उघड…!
बीड दि.२८ – स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने मोटार सायकल चोरी करणारा आरोपी पकडुन चार मोटार सायकल केल्या जप्त करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस अधीक्षक बीड यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत. त्यावरून श्री. उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा,बीड येथील पोलीस हवालदार भागवत शेलार यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम अथर्व सोनवणे याचेकडे चोरुन आणलेली मोटार सायकल असुन तो विकण्याच्या तयारीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच पो.नि. श्री.उस्मान शेख यांनी मार्गदर्शन करुन स्थागुशा पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. दिनांक 26/10/2024 रोजी पोह भागवत शेलार व स्टाफ यांनी संशयीत इसम नामे अथर्व हरिश्चंद्र सोनवणे रा.गिरामनगर बीड याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेजवळ असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने माजलगाव येथुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. आरोपीजवळ दोन होंडा शाईन, एक युनीकॉर्न व एक पॅशन प्रो असे एकुण चार मोटार सायकल मिळुन आल्या असुन वाहनाचे अभिलेख पडताळणी केल्यानंतर 1) पो.स्टे.माजलगाव ग्रामीण गुरनं 137/2024 कलम 379 भादंवि मधील होंडा शाईन 2) माजलगाव शहर 230/2021 कलम 379 भादंवि मधील होंडा शाईन असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर दोन युनीकॉर्न व पॅशन प्रो चे वाहनाचा मालकाचा शोध चालु आहे. एकुण 1,40,000/- रु चा मोटार सायकल मुद्देमाल स्थागुशा पथकाने जप्त केला आहे.
सदर आरोपीकडुन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन आरोपी व चार मोटार सायकलचा मुद्देमाल पो.स्टे.माजलगाव ग्रामीण पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास माजलगाव ग्रामीण पो.स्टे.व स्थागुशा बीड करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगाळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड , श्री. उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोह/भागवत शेलार, युनुस बागवान, देविदास जमदाडे, पोशि/ नारायण कोरडे यांनी केलेली आहे.
ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा बीड आणली उघडकीस, चार आरोपी निष्पन्न् करुन चोरीस गेलेला ट्रॅक्टर केला जप्त….!
दिनांक 27/10/2024 रोजी पो.स्टे.माजलगाव ग्रामीण गुरनं 227/2024 कलम 303(2) BNS मधील ट्रॅक्टर चोरीचा स्थानिक गुन्हे शाखा,बीड समांतर तपास करीत असतांना स्थागुशा येथील पोलीस हवालदार जफर पठाण यांना ट्रॅक्ट चोरी केलेल्या आरोपीची गोपनिय माहिती मिळाली की, इमस नामे रोहन अभंग हा अंमलवाडी येथे फाटा येथे ट्रॅक्टर घेवुन आल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांनी पुढील कारवाई करण्यासाठी ग्रे.पोउपनि श्री. हनुमान खेडकर यांचे पथकास पाचारण केले. स्था.गु.शा.पथकाने अंबलवाडी फाटा ता.परळी वै. येथे सापळा रचुन अंमलवाडी फाटा ता.परळी वै. येथे उभा असलेल्या टॅ्रक्ट वरील संशयीत दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांची नावे 1) हनुमंत सिताराम वय 28 रा.अंबलवाडी ता.परळी वै. 2) रोहन अनिल अभंग वय 28 रा. संगमनेर ता.अहिल्यानगर(अहमदनगर) असे सांगितले तेव्हा त्यांना ट्रॅक्टर बाबत बारकाईने चौकशी केली असता त्यांनी सदर टॅक्टर पवारवाडी शिवार माजलगाव येथुन त्यांच्या इतर दोन साथीदारांसह मिळुन ट्रॅक्टर चोरी केल्याचे सांगितले.
निष्पन्न आरोपीचे ताब्यातुन वर नमुद गुन्हयातील एक गुन्हयात गेलामाल स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर रोटरसह कि.अं.3,00,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळुन आलेले दोन आरोपी व जप्त ट्रॅक्टर पो.स्टे.माजलगाव ग्रामीणचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे.माजलगाव ग्रामीण करीत आहेत. इतर दोन निष्पन्न आरोपींचा शोध स्थागुशा व पो.स्टे.घेत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री. उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली ग्रेपोउपनि श्री. हनुमान खेडकर, पोह/ जफर पठाण, महेश जोगदंड, देविदास जमदाडे, तुषार गायकवाड, पोअं/बप्पासाहेब घोडके, अश्विनकुमार सुरवसे, चालक गणेश मराडे यांनी केली आहे.