आपला जिल्हा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी – राहुल सोनवणे
केज दि.२० – देशाच्या सर्वोच्च सभागृहात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाषणात बोलताना घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांनी याबद्दल जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टीने नेहमीच जातीयवादाचे बीज रोवले आहेत अनेक वेळा विविध जातीबद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे हे आजपर्यंत अशा प्रकारामधून सिद्ध झालेले आहे. मात्र देशातील जनता हे कधीही खपवून घेणार नाही. परवा संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलताना आंबेडकर आंबेडकर म्हणायचं ही आता फॅशन झालीय असे निंदनीय वक्तव्य केले याचे पडसाद संसदेत तर उमटलेच मात्र देशात ही सर्वत्र याबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी हे शब्द मागे घ्यावेत व देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केली आहे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने दिला आहे.
खा. रजनीताई पाटील आक्रमक
या प्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा.रजनीताई पाटील यांनी देखील या भाषणाच्या दरम्यान राज्यसभेत या वक्तव्याचा निषेध नोंदवत अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. या प्रकारामुळे संसदेत गोंधळाचे वातावरण तयार झाले विरोधी पक्षाच्या खासदारांनी याबाबत सभागृह बंद पाडले.