ब्रेकिंग
”त्या” कामगाराच्या मृत्यूचे प्राथमिक कारण आले समोर….!
केज दि.१७ – शहरातील एका दारूच्या दुकानासमोर आवादा कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत असलेल्या एका कामगाराचा मृतदेह (दि.१७) आढळून आला होता. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट जरी झालेले नसले तरी त्या व्यक्तीचा मृत्यू सर्प दंशाने झालयाची प्राथमीक माहिती समोर आली आहे.
शहरातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या एका दारूच्या दुकानासमोर आवादा कंपनीमध्ये कामगार असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी पुढील कार्यवाही करत सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ घेऊन जात त्या ठिकाणी तपासणी केली आणि डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.
दरम्यान सदरील मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस आणि रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.