देशविदेश

गायी घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी

दिवसभरातील प्रमुख घडामोडी

???? थकलेल्या हप्त्यांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज घेणे थांबवावे असे म्हणत न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करीत रिझर्व्ह बँकेसह सर्वच बँकांना तसे आदेश द्यावेत, असे साकडे घालणारी जनहित याचिका अर्जदार गजेंद्र शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
???? ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. यासंदर्भातील 2017चा निर्णय रद्द करण्यात आला असून ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली
???? उपनगरातील सात लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसणार आहेत. मीटर रीडिंगची कटकट कमी करण्यासाठी वीज नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीला पहिल्या टप्प्यात उपनगरातील वीज सात लाख ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी टेंडर मागवले आहे.
???? सध्या करोना विषाणूचा कहर जोमात आहे. अशावेळी रुग्णांच्या लक्षणांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करून लस व औषध शोधण्यात संशोधक गर्क आहेत. अजूनही यावर ठोस उपाय सापडलेला नाही. मात्र, कोविड १९ च्या गंभीर आजारी रुग्णांना बरे करण्यासाठी स्‍टेरॉइड उपयोगी ठरत असल्याची गुड न्यूज आलेली आहे.
???? भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी आणि सीमावादावर चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने बोचरी टिका केली आहे. ग्लोबल टाईम्सने भारत  -२४ टक्के जीडीपी होण्यासह भारत सीमेवर तणाव सहन करू शकणार नाही, असे म्हटले आहे.
???? लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन सरकार नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारसमवेत भारत-नेपाळ सीमेवर भारतविरोधी निषेधासाठी वित्तपुरवठा करीत आहे. याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे.
???? जपानच्या दक्षिणेकडे 5800 गायी घेऊन जाणाऱ्या जहाजाला आज जलसमाधी मिळाली. या जहाजावर 43 कर्मचारी होते. जहाजावरून बेपत्ता होण्याच्या आधी खराब हवामानाच्या संकटात अडकल्याचा संदेश पाठविण्यात आला होता. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिराने जहाजावरील एका कर्मचाऱ्याला पाण्यातून वाचविण्यात आले.
???? ऑक्टोबर महिन्यातच मुख्य परीक्षा घेऊन निकालही 31 ऑक्टोबर पूर्वी लावावा असा राज्य सरकारचा मानस आहे. त्यासोबतच 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close