देशविदेश

दिवसभरातील प्रमुख घडामोडी

???? आता भारतात तयार होणार AK-203 रायफल , ही रायफल 1 मिनिटात 600 गोळ्या झाडू शकते.
???? अमेरिकेतील कंपनी नोवावॅक्सने आपल्या लसीच्या चाचण्यांबाबत माहिती दिली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार NVX-CoV2373 ही लस चाचणीदरम्यान सुरक्षित ठरली आहे. जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसन कंपनीनं कोरोनाची लस Ad26 प्राण्यांवर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले आहे.
???? महाराष्ट्र सरकारतर्फे पूरग्रस्त भागातील लोकांसाठी आणि त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी तब्बल १६.५० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ‘बिन बादल बरसात’ अशी परिस्थिती नागपूरसह विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यांमधील अनेक गावांना महापुराचा प्रचंड फटका बसला आहे.
???? अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, तर निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होईल. तसेच 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
???? राज्यात सात-बारा उताºयात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. आता सातबारा साधा, सहज समजेल अशा भाषेत असणार आहे. त्यावर क्यूआर कोडही असणार आहे.
???? ‘आयटी हब’, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. देशाच्या तुलनेत ७ टक्के, तर राज्याच्या तुलनेत २६.७ टक्के रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. मुंबईत ॲक्‍टिव्ह रुग्ण २१ हजार ४३९ असून, पुण्यात ही संख्या आता ५४ हजार ८३८ झाली असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आली.
???? एसटी महामंडळात सरळसेवा भरती-2019 अंतर्गत सेवेत नेमणूक झालेल्या चालक आणि वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती एसटी महामंडळाने उठवली आहे.
???? खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे.असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने निर्देश दिले आहेत. खासगी बस सुरू करण्यात आलेल्या आहेत .

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close