
बीड दि.२५ – जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्हयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बीड जिल्हयात होत असलेल्या चोऱ्या, घरफोड्या, खुन व खुनाचा प्रयत्न, दंगा, जबरी चोऱ्या, दरोडा टाकणारे गुन्हेगार व लोकांना मारहान करुन गंभीर जखमी करुन जनतेमध्ये दहशत निर्माण करणारे बीड जिल्हयातील गुन्हेगारावर करडी नजर आहे. आणि याचाच एक भाग म्हणून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या केज तालुक्यातील चौघांना तडीपार केले आहे.
केज पो.स्टे. प्रशांत महाजन यांनी बीड व लगतचे जिल्हयात टोळीने गुन्हे करणारे अजय अशोक तांदळे रा. कोरेगांव ता.केज जि.बीड, विकास सुभाष सावंत रा. सावंतवाडी ता. केज जि.बीड, सोमनाथ राजाभाऊ चाळक रा. लव्हुरी ता. केज जि.बीड व बालाजी राम लांब रा. कोरेगांव ता. केज जि.बीड यांचे टोळीवर शरीरा विरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा करणे, जिवेमारण्याच्या धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, लोकांना मारहाण करुन जखमी करुन, गुंडगिरी करुन जनतेमध्ये दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल असल्याने व त्यांची जनतेमध्ये दहशत निर्माण होत असल्याने सदर टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी व सदर टोळीची पांगा पांग करण्यासाठी त्यांचे टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे दि.24.10.2024 रोजी हद्दपार प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयास सादर केला होता. सदर प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी केज यांनी चौकशी पूर्ण केल्या नंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी त्यांना दि. 10.02.2025 व दि.20.02.2025 रोजी त्यांचे म्हणने मांडण्यास संधी देऊन व त्यांचे टोळीवरील गुन्हे, लोकांमधील दहशत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहुन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सदर टोळीची पांगा-पांग करणे साठी सदर टोळीस बीड, लातुर, धाराशिव जिल्हयाचे कार्यक्षेत्रातुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे दोन वर्षे कालावधीसाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दि.25.02.2025 रोजी आदेश पारीत करुन हद्दपार केले आहे.
दरम्यान, सदरील चौघांना तीन जिल्ह्यातून तडीपार केल्याने इतर गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली असून जिल्ह्याला लागलेला गुन्हेगारीचा कलंक कांही अंशी का होईना कमी होण्यास मदत होणार आहे.
