क्राइम

पोटच्या मुलांकडून आईला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

दोन्ही मुले पोलिसांच्या ताब्यात

केज दि.४ – पैशासाठी कोण कुठल्या स्तराला जाईल याचा नेम राहिलेला नाही. एरव्ही अनेक घटना घडतात मात्र स्वतःच्या दोन मुलांनीच आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील कानडी माळी येथे घडली असून दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.
      तालुक्यातील कानडी माळी येथील इंदुबाई लालासाहेब कुचेकर (५०) ह्या महिलेचे पती लालासाहेब हरिभाऊ कुचेकर पोलीस दलात नौकरीस होते. मात्र २००५ मध्ये ते परळी येथे कर्तव्यावर असताना अचानक गायब झाले. दरम्यान त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला मात्र २०१३ पर्यंत शोध न लागल्याने त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यामुळे मागच्या पंधरा वर्षांपासून सदरील महिला कानडी माळी येथे माहेरी राहून उपजीविका भागवत आहे. दरम्यान पतीच्या नौकरीचे कालावधीचे पि.एफ तेरा लाख चौ-याएंशी हजार रूपये सन २०१८ च्या ऑगस्ट महिण्या मध्ये सदरील महिलेला मिळाले. त्यापैकी नऊलाख चौऱ्यांशी हजार रूपये तिने तिचे बीड येथे राहत असलेली दोन्ही मुले संतोष व नितीनला बोलावुन दिले. परंतु त्यानंतरही त्यांनी आम्हांला आणखी पैसे दे म्हणुन सन २०१८ पासुन घरी येवुन सतत शिवीगाळ व हाणमार  करत होते. त्याचप्रमाणे दिनांक ३ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी एक वाजण्याचे सुमारास संतोष व नितीन कानडीमाळी येथे आले व पैसे देण्याच इंतजाम कर म्हणत आईला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी सदरील महिलेने गावातील माणसे गोळा करून तुम्हाला पैसे देवुन टाकते असे म्हटल्यावर दोघेही निघुन गेले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास महिला घरी असताना संतोष व नितीन घरी
आले व राहिलेले पि.एफ चे पैसे मागु लागले. तेव्हा माझ्याकडे आता पैसे नाहीत असे महिलेने सांगितले. त्यावेळी संतोषच्या हातामध्ये असलेली पेट्रोलची बॉटल हिच्या अंगावर टाक व असे नितीन म्हणाला असता सदरील महिला घाबरून पळाली. मात्र संतोष व नितीन हे दोघेही पाठीमागे पळाले व संतोष याने त्याचे हातातील बॉटलमधील पेट्रोल आईच्या अंगावर टाकले.तर दुसरा मुलगा नितीन याने जिवे मारण्याच्या उद्देशाने काडी पेटीतील काडी पेटवुन आईच्या अंगावर फेकली. मात्र तेवढ्यात गावचे सरपंच अमर सोपान राऊत यांनी नितीनच्या हातावर मारून पेटलेली काडी विझवली व त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावुन फेकुन दिली. तर रोडवर असलेले शिवाजी रधुनाथ राऊत, विशाल रामकिसन पारवे, शहाजी खाडे, कान्हु पंढरी खाडे यांनी दोन्ही मुलांना पकडले व महिलेचा भाऊ कान्हु पंढरी खाडे यांनी धरून बाजुला नेऊन बसवले म्हणून अनर्थ टळला.
            सदरील प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून नितीन लालासाहेब कुचेकर व संतोष लालासाहेब कुचेकर या दोन्ही मुलांवर केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक करून कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दादासाहेब सिद्धे हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close