चाकूचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग
केज दि.१४ – तालुक्यातील एका गावातील महिलेला मोबाईल फोनवरून घरा बाहेर बोलावून ती बाहेर येत नसल्याने ती शौचास जात असताना तिला गाठून विनयभंग केला आणि तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत तोंडावर मारहाण केली.
श्रीकांत सज्जन मुंडे हा महिलेला फोन करून तू घरा बाहेर ये असे म्हणाला. मात्र त्या महिलेने त्यास घरा बाहेर यायला नकार दिला. नंतर सायंकाळी ९.३० वा. दरम्यान ते शौचाला बाहेर पडली असता; सदरील व्यक्तीने तिचा हात धरून तू बाहेर का येत नाहीस? असे म्हणून विनयभंग केला. तीने मोठ्याने आरडाओरड केली तेंव्हा तिला चाकूचा धाक दाखवून तोंडावर बुक्की मारून जखमी केले.
या प्रकरणी दि.१३ ऑक्टोबर रोजी पीडित महिलेने केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून श्रीकांत सज्जन मुंडे याच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४४३/२०२० भा.दं.वि. ३५४ ( ड ) , ३२४, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत.
दुरुस्ती……..
दरम्यान वरील बातमीत अनावधानाने दत्ता लक्ष्मण घोळवे यांच्या नावाचा उल्लेख झाला होता. परंतु त्यांचा घटनेशी काही एक संबंध नाही. त्या गुन्ह्यातील त्यांच्या नावा ऐवजी श्रीकांत सज्जन मुंडे असे वाचावे. दत्ता लक्ष्मण घोळवे यांना झालेल्या मनस्ताप व त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत.