केज दि.१७ – मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असून ही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिला बाहेरगावी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील युसुफवडगाव हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीला विकास गोविंद चाटे याने पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असून ही तिला लग्नाचे आमीष दाखवून दि.२७ मार्च 2019 रोजी तिचे अपहरण केले. लग्नाचे अमिष दाखवून पुणे, दोनवडे गाव, कोल्हापूर येथे नेऊन तिच्यावर 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत लैंगिक अत्याचार केला. मात्र पिडीत मुलीने लग्नाचे विचारले असता तिला सोडून दिले. दरम्यान, सदरील प्रकरणात विकास चाटे याच्या आईवडीलाने मदत केली. पीडितेच्या फिर्यादीवरून विकास चाटे व त्याचे आईवडील या तिघांविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय आटोळे हे पुढील तपास करत आहेत.
—————-–————————————
वाचा कधी येणार कोरोना लस…..!
मुंबई | या वर्षाखेर अथवा पुढील वर्षात पहिल्या तीन महिन्यात लस भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता सिरम इन्स्टिट्यूटनं व्यक्त केली आहे. मार्च 2021 पर्यंत भारताला कोरोनावरील लस मिळू शकते, असं ‘सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी माहिती दिली.
अनेक कंपन्या कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. भारतात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. दोघांवर तिसऱ्या फेजच्या लसीचा डोस देण्याची तयारी सुरु आहे. तर एकावर दुसऱ्या फेजचा डोस देण्याचा ट्रायल सुरु आहे, असं सुरेश जाधव यांनी सांगितलं आहे.