महाराष्ट्र
मांजरा नदीकाठच्या गावांना अति दक्षतेचा इशारा……पाणी साठा ८५ टक्क्यांच्या पुढे……!
केज दि.१८ – केज अंबाजोगाई सह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दि.१८ रोजी सकाळी 11 पर्यंत 85.29 % पाणी साठा झालेला आहे. याच वेगाने पाण्याची आवक सुरू राहिली तर येत्या तीन चार दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते.त्यामुळे लातूर आपत्ती व्यवस्थापन शाखेने धरणा खालील गावांना अति दक्षतेचा इशारा दिला असून मंडळाधिकारी व तलाठी यांनी मुख्यालयी राहून सदरील दर दोन तासाला नियंत्रण कक्षाला अहवाल सादर करण्याचे आदेश लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिले आहेत.