आरोग्य व शिक्षण
खबरदार…….! मास्क वापरला नाही तर झाडावा लागेल रस्ता……?
मुंबई | कोरोनाचा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्कची सक्ती केली आहे. तर मास्क न घालणाऱ्या नागरिकांना दंडही ठोठवला जातोय. मात्र तरीही अनेकजण मास्कचा वापर करत नसल्याने मुंबई महापालिका आता कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत. अशा व्यक्ती आढळल्या आणि जर त्यांनी 200 रुपये दंड भरण्यास नकार दिला किंवा वाद घातल्यास तासभर रस्ता झाडावा लागू शकतो.मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन उप-कायद्यांनुसार ही शिक्षा लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला रस्त्याची झाडलोट करण्यासोबत भिंतींवरील चित्र साफ करण्याची शिक्षा देखील होऊ शकते.
नियम मोडून देखील ज्या व्यक्ती ही कामं करण्यास नकार देतील त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल होऊ शकते.