शेती
कोरोना काळात ”लंपी” चा प्रादुर्भाव……. पशुधन धोक्यात (बाधित जनावराला १४ दिवस कॉरंटाईन ठेवणे गरजेचे)
दुष्काळात तेरावा
बीड दि.२ – साऊथ आफ्रिकेतुन महाराष्ट्रातील गडचिरोली मार्गे सर्वत्र पसरलेल्या लंपी रोगाने पशुधन धोक्यात आले असून ऐन कोरोनाच्या काळात पशुधनावर आलेल्या संकटामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
मागच्या कांही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लंपी रोगाने थैमान घातले आहे. जनावरांच्या अंगावर पुरळ येणे हे त्याचे प्रमुख लक्षण असून हा रोग अति संसर्गजन्य आहे. त्यामुळे एका पासून अनेक जनावरे बाधित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
केज तालुक्यात ९ हजार जनावरांना लसीकरण……!
केज तालुक्यातील जनावरांना मोठ्या प्रमाणावर बाधा होऊ लागल्याने संबंधित भागातील सुमारे ९ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दत्ता मसने यांनी दिली. तसेच औषधोपचाराची कसल्याही प्रकारची कमतरता नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जनावरांना लक्षणे दिसताच दवाखान्यात आणून औषधोपचार करून घ्यावेत. आणि ज्या जनावराला बाधा झालेली आहे त्या जनावरास पूर्णपणे १४ दिवस कॉरंटाईन करणेही गरजेचे असल्याचे सांगितले.
घरगुती उपायाने हा रोग इतर जनावरांना होत नाही……!
दरम्यान उष्ण वातावरणात अति वेगाने प्रसार होणारा हा रोग घरगुती उपायाने नियंत्रणात येतो. यासाठी १ लिटर पाण्यात निम तेल व करंज तेल ४० ग्राम तसेच १५ ग्राम अंगाला लावण्याच्या साबनात द्रावण करून ज्या जनावरांना बाधा झालेली नाही त्यांच्या अंगावर सिपंडावे. त्यामुळे त्याच्या वासाने माश्या जवळ येत नाहीत व संसर्ग वाढत नाही अशी माहिती डॉ.मसने यांनी दिली.