मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनावरील शुक्रवारची सुनावणी झाली. न्यायालयाला सोमवारपासून दिवाळीची सुट्टी असल्याने शनिवारी केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर सुनावणी घेण्याचं स्पष्ट करण्यात आलं. अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला.
अर्णब यांनी आपल्या वाहिनीद्वारे सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे अर्णब यांची अटक हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा दावाही हरिश साळवे यांनी केलाय.न्यायालयाला दिवाळीची सुट्टी लागेल आणि अर्णब यांना जामीन मिळू शकणार नाही, हे सरकारला माहित आहे. त्यामुळेच अर्णब यांना धडा शिकवण्यासाठी अटक करण्यात आली, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.