महाराष्ट्र
या दिवाळीला ऑनलाईन ओवाळणीचा सल्ला…….! वाचा कुणी दिला….?
बीड – ऑनलाईन च्या जमान्यात बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होत आहेत, आणि याचाच धागा पकडून दिवाळीची ओवाळणीही ऑनलाईन केली जावी असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने दिवाळीनिमित्त फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून भावा-बहिणींनाही भाऊबीज घरातूनच ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.
सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नका, अशी सूचनाही पालिकेने केली आहे.यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाज्यात ठेवण्यास सांगण्यात आलं असून हातपाय, चेहरा धुऊनच घरात प्रवेश करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत.