आरोग्य व शिक्षण
कोरोनावर लस तयार केल्याचा ”या” कंपनीने केला दावा……!
कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोनावर लवकरच लस येणार आहे. कारण ही लस चाचणीत 90 टक्के प्रभावी ठरली आहे, असं ट्रम्प म्हणालेत.
फायजर लसीची ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे.दरम्यान, अमेरिकेची कंपनी फायजर आणि जर्मनीची बायोएनटेक कंपनी दोघे मिळून कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे.