शेती
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा…….!
मुंबई | रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यास सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही नितीन राऊत यांनी यावेळी बोलताना प्रतिक्रिया दिली. वीज कर्मचारी सध्या माझ्याशी चर्चा करत आहेत. हा तिढा लवकरच सुटेल. वीज कर्मचारी संपावर जाणार नाहीत. कोणाचीही दिवाळी अंधारात जाणार नाही, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील वीजेची मागणी वाढली असली तरी पुरेसा वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही नितीन राऊत यांनी दिली.