बारमध्ये जाणाऱ्यांमुळेही कोरोना वाढला……..!
मुंबई दि.२२ – फक्त धार्मिक स्थळंच नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमुळेही कोरोनाचा प्रसार होतो, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितलं.
कोव्हिडचा आकडा फुगत आहे. मात्र कोरोनाबाबत जनता गंभीर नाही. कोव्हिडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावं. लांब पल्ल्याच्या गाड्या 15 दिवसांसाठी रद्द कराव्या, याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. केवळ धार्मिक स्थळांमुळे कोरोना पसरतो, असं मी म्हटलं नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या व्यक्तींमुळेही कोरोना पसरला, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आहेत, म्हणून इतर राज्यातील तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस कमी आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्क्याच्या लोकांनी घातला आहे, आम्ही त्यांना दाखवून देऊ आमची ताकद काय आहे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला.