देशविदेश
आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्याला लॉक डाउन करता येणार नाही…….!
आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्याला लॉक डाउन करता येणार नाही…….!
नवी दिल्ली दि.25 – देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. तसेच घरी जाऊन आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.
कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावं, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.