आरोग्य व शिक्षण
रजनीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान !
सचिन रोडे यांचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प
डी डी बनसोडे
December 5, 2020
केज दि.५ – काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा जम्मु काश्मीरच्या प्रभारी माजी खा. रजनीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथे क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील प्रतिष्ठान केज यांच्या वतीने रामराव पाटील माध्यमिक विद्यालय केज च्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी युवा नेते राहुल सोनवणे, केज नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष शितल दांगट, पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप, दलिलभाई इनामदार, कबीर इनामदार, अमर पाटील, बाळासाहेब ठोंबरे, महादेव लांडगे, कपिल मस्के, कविता कराड, संगीता साळवे, अंगद गुंड, सुजित सोनवणे, सचिन रोडे, मजहर शेख, समीर देशपांडे, अरुण गुंड, ताहेर कुरेशी, रणजित खोडसे हे उपस्थित होते.
——————————————–
सचिन रोडे यांनी केला मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प !
यावेळी युवक काँग्रेसचे सचिन रोडे यांनी रजनीताई पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला असून त्यांनी तशी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नोंदणी केली. याबद्दल त्यांचा राहुल सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले यात दलिल इनामदार ,अमर पाटील, शुभम जाधव, दीपक धिवार, उषा वळसे, शीतलताई दांगट, सुजित सोनवणे, धनंजय रोडे , संगीता साळवे, नितिन रसाळ, संतोष राऊत, काबिरोद्दीन इनामदार, मजहर शेख, सुनील देशपांडे, सचिन रोडे, गोपीचंद मगर, भागवत थोरात, प्रवीण देशपांडे, अविनाश काळे, देविदास सुसंगे, विष्णू घुले, संभाजी देशमुख, संतोष गुंड, गणेश सत्वधर, अंकुश मस्के, नवनाथ जाधव, अमोल गित्ते, विशाल डोईफोडे, प्रकाश केंद्रे, नितीन जाधव या रक्तदात्यांनी रक्तदान केले.