आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
मराठा युवकांची ई डब्ल्यू एस मधून तलाठीपदी नियुक्ती करा, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
औरंगाबाद दि.१३ – मराठा समाजाच्या दिलेल्या आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवाराना आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा व तलाठीपदी नियुक्ती देण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली असून यामध्ये सरकारला तातडीने म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिकाकर्त्यां पेक्षा कमी गुण आहेत. उपकेंद्र सहाय्यक उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या याचिकेत दिलेला असताना औरंगाबाद जिल्ह्यात तलाठी भरती करिता निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. यावर न्या. एस पी गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन 18 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस जारी केली आहे.