आपला जिल्हा
बीड मध्ये उभारले महाराष्ट्रातील पहिले दुकान……!
बीड, दि. १९ – महिला बचत गटाच्या शॉप मुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या महिला बचत गटाच्या उत्पादनांना विक्री साठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे त्यामुळे महिला गटांचे आर्थिक उत्पन्न वाढीस गती मिळेल अशी आशा करतो. बीड मधील नागरिकांनी या हिरकणी या आज उद्घाटन झालेल्या शॉप ला भेट देऊन महिला बचत गटाचे उत्पादने घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालया समोर नगर रोड, बीड येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान(VSTF) व महिला बचत गट यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दुकानाचे उद्घाटन राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रामनाथ सुब्रमण्यम, मुख्य कार्यकारी अधिकारी VSTF, चंद्रकांत माळी , अभियान व्यवस्थापक VSTF, प्रतिक आयरे अभियान सहकारी VSTF, श्री अमित मस्के जिल्हा व्यवस्थापक VSTF, सौ सुनिता पोफळे, अध्यक्ष हिरकणी महिला बचत गट आदी उपस्थित होते. सदरील बचत गटाच्या हिरकणी शॉप मध्ये महाराष्टातील २५ जिल्ह्यातील विविध बचत गटाचे एकूण ५२ उत्पादने विक्री साठी उपलब्ध आहेत. या हिरकणी शॉपच्या मोबाईल ऍप चे online उद्घाटन रामनाथ सुब्रामाण्याम, मुख्य कार्यकारी अधिकारी , VSTF, यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ग्रामीण भागांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने एक अद्वितीय यंत्रणा आहे. ग्रामीण भागांमध्ये फक्त मूलभूत सुविधा निर्माण करणे एवढाच या अभियानाचा हेतू नसून शाश्वत (Sustainable ) विकासासह गावे सक्षम बनवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यामध्ये प्रमुख आर्थिक उद्धीष्टामधील महत्वाचे उध्दीष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे आणि महिला बचत गट यांच्या उत्पादनांना बाजार पेठ उपलब्ध करून देणे जेणे करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल, त्या अनुषंगाने आपण ५०० महिला बचत गट /शेतकरी गट / कंपनी /सहकारी संस्था यांच्या कृषी आणि अकृषी उत्पादनांना बाजारपेठ जोडणी करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या क्षेत्रातील विकास प्रक्रियेतील अभाव दूर करण्याच्या तसेच महिला बचत गट , सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या दुवारे निर्मिंत उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्याच्या व्यवसायिक क्षमता व्रदिगत करणे ,गुणात्मक विकासाकरता आवशकतेनुसार प्रशिक्षण आणि विक्री व्यवस्था करणे इत्यादी मुलभूत उदेशाने ही संकल्पना घेऊन आलो आहोत. या उद्देशासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) एकत्रित काम करत आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी – समुदाय संस्था (CBO) यांना शहरी भागातील बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्न वाढीस सहाय्य होऊ शकेल.
यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी – बचतगट – समुदाय संस्था (CBO) ह्या ग्रामीण भागातील शेतमाल व प्रक्रिया उत्पादने शहरी भागामध्ये पाठवून तेथील बचतगटांना उपलब्ध करून देतील. जेणेकरून शहरी बचतगटांना चांगल्या दर्जाचा शेतमाल व इतर उत्पादने शहरी ग्राहकांपर्यंत पोहचविणे सोयीस्कर होईल.