ब्रेकिंगमहाराष्ट्र
ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय…….वीजबिल वसुलीसाठी नवा फंडा……!
पुणे दि.२४ – ऊर्जा विभागाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कृषी आणि ग्रामीण भागातील वीज बील वसुलीसाठी ग्रामपंचायतींना वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत.सध्या महावितरण समोर वीज बिल वसुली कशी करावी हा मोठा प्रश्न आहे. याचसाठी उर्जा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे जारी केलेल्या लाॅकडाऊनमध्ये कृषीसह, वाणिज्य अौद्योगिक यांच्यातील थकबाकीत वाढ झाली आहे. या वर्षी ॲाक्टोबर महिन्याच्या अखेरीस कृषी थकबाकी 43,356 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली असून थकबाकी वसुलीसाठी ऊर्जा विभाग आणि महावितरणाकडून विविध उपाययोजना आखल्या आहेत. या अंतर्गतच ग्रामपंचायतींना वीज वसुलीचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.