क्राइम
बीड जिल्ह्यात पुन्हा एकाला ऑनलाईन फसवले…….!
बीड दि.11- मागच्या कांही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच पुन्हा एका घटनेची भर पडली असून, तुम्हारे लिए हमारे पास जॉब है, तुमको भेजी गई लिंकपर तुम्हारा पुरा फॉर्म भरो, असे म्हणल्यानंतर फिर्यादीने ती लिंक ओपन करताच ३१ हजार रुपयांचा दणका फिर्यादीला बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शनिवारी (दि.९) ग्रामीण पोलिसात त्याने तक्रार दाखल केली.
बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील खासगी कंपनीत काम करणारे सतीश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांना एका महिलेचा कॉल आला, तुम्हाला जॉब साठी एक लिंक पाठवत आहे त्या लिंकवर क्लिक करून एक फॉर्म भरा त्या फॉर्मची किंमत शंभर रुपये आहे सदर तरुणाने त्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरताचं त्यांच्या क्रेडिट कार्डातून एकतीस हजार रुपये डेबिट झाले. या प्रकरणी सतीश शिंदे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार नोंदवली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक साबळे हे करत आहेत.
बीड-माहिती आणि तंत्रज्ञानामुळे सध्या प्रचंड प्रमाणात गतीने कामे होत आहेत. मात्र याच युगात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्हावासियांनो, या ऑनलाईन फसवणूकीपासून साधव रहा, फसव्या ऍपळ्दारे कर्ज घेवू नका, स्वत:चा आधार आणि पॅन क्रमांक कोणाशीही शेअर करू नका, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी आणि बीडच्या सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.