महिलेच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा खुलासा
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, रेणू शर्मा यांची बहिण करुणा यांचा धनंजय मुंडे यांच्यासोबत प्रेमविवाह झाल्याचा दावाही करण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ माजली होती.
या सर्व आरोपांना धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले असून करुणा शर्मा या महिलेसोबत आपण परस्पर सहमतीने संबंधात होतो आणि तिच्या दोन आपत्यांना आपण आपले नाव दिले आहे. विशेष म्हणजे या दोन आपत्यांना माझ्या कुटुंबियाने सामावून घेतले आहे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे मात्र करुणा शर्मा यांची बहिण रेणु शर्मा 2019 पासून आपल्याला ब्लॅकमेल करत असून शरीरिक इजा करण्याच्या धमक्या सुद्दा तिने दिल्या आहेत. तसेच या प्रक्रियेत तिचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात करुणा शर्मा यांनी सोशल मिडियात काही आक्षेपार्ह्य साहित्य प्रकाशित केले होते, त्यानंतर उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांना असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध घातला होता. सदर याचिका न्यायालयात प्रलंबीत आहे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले असून रेणू शर्मा यांनी केलेले आरोप हे बदनामी करण्यासाठी आणि ब्लॅकमेलींगमधून आहेत असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.