#Social
अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या पहिल्या महिला राजमाता जिजाऊ – प्राचार्या साळुंखे
महा डिजीटल मीडिया असोसिएशन कडून कार्यक्रम संपन्न
अमरावती दि.१३ – अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या राजमाता जिजाऊ या पहिल्या महिला आहेत. त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा विचाराने रोवलेली पार काढून टाकून त्याठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. तसेच अमावस्या रात्रीचा फायदा घेत अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यास सांगून त्या यशस्वी करून दाखवल्या असे विचार प्राचार्या उज्वला ताई साळुंखे यांनी व्यक्त केले.राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘वकीलपत्र’ या युट्युब चॅनल वरती रात्री 9.30 वाजता सामाजिक क्षेत्रात विशेष कामगीरी करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
त्याचबरोबर ऍड. उर्वी केचे यांनी महिलांविषयी असणारे कायदे व त्याबद्दल माहिती देऊन ते कायदे कधी व कशाप्रकारे वापरावेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्राध्यापिका सारिका नाईकनवरे यांनी महिलांचे आर्थिक धोरण व नियोजन कश्या प्रकारे असते व त्यामुळे यशस्वी पुरुषाच्या मागे त्या कश्या खंबीरपणे उभ्या असतात हे स्पष्ट केले. ऍड. शीतल बेंद्रे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.