क्राइम
बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपींना मुद्देमालासह अटक……..! बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…….!
डी डी बनसोडे
January 26, 2021
बीड दि.26 – जिल्ह्यामध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या महीलांवर पाळत ठेवुन त्यांचे एस टी प्रवासादरम्यान बँगमधील, गळ्यातील दागिने चोरी करण्याचे गुन्हयामध्ये वाढ झालेली दिसुन आली होती. त्यामुळे पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना योग्य सुचना देवुन नमुद गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार पो.नि. स्थागुशा यांनी त्यांचे अधिपत्याखालीला अधिकारी व कर्मचारी यांनी महिला आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. योग्य मार्गदर्शन करुन सदर गुन्ह्यातील आरोपींची माहीती घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक 25/01/2021 रोजी स्थागुशा चे अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारांचा बीड शहरात शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, बसमधील महीला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महीला सोनी चव्हाण व रोहीणी चव्हाण या प्रवाशांचे चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी वेरना कार क्रमांक एम एच 12 जे यु 4500 या गाडीत बसुन गेवराईकडुना बीडकडे येत आहेत. अशी माहीती मिळाल्याने जालना रोडवरील संगम हॉटेल समोर रोडवर पोलीस पथक सापळा लावुन थांबले असता सदर गाडी गेवराईकडुन येत असताना दिसल्याने तिला दुपारी 3.30 वा च्या सुमारास थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडी चालकाने त्याची गाडी बाजुला उभी करुन तो पळुन गेला. मात्र सदर गाडीतील सोनी पप्पु उर्फ जावेद चव्हाण, रा. नागझरी, ता. गेवराई, जि बीड, रोहीणी शहादेव चव्हाण, रा. बांगर नाला, बालेपीर, बीड यांना ताब्यात घेतले. त्यांची पंचांसमक्ष महीला पोलीसांनी अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत एक सोन्याचे मन्याचे गंठण, एक सोन्याचे पट्टीचे गंठण व एक सोन्याचे मनीमंगळसुत्र किमती 1,65,000/- रुपयाचे मिळुन आले. त्यांना सदर दागिन्यांबाबत विचारपुस केली असता त्यांनी ते दागिने अंदाजे आठ नऊ दिवसांपुर्वी नेकनुर बस स्टँड येथे बसमध्ये, पाच सहा दिवसांपूर्वी मांजरसुंबा ते बीड बस प्रवासात, पंधरा दिवसांपूर्वी धारुर बस स्टँड येथे चोरल्याचे सांगितले. तसेच अंदाजे दहा पंधरा दिवसांपूर्वी धारुर ते माजलगाव एस टी बस प्रवासात व पाच सहा दिवसांपुर्वी माजलगाव ते तेलगाव एस टी प्रवासात पण महीलांचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. तसेच सदर वेरना कार ही आम्ही चोरी करण्यास जाण्या येण्यासाठी वापरत असुन ती पप्पु उर्फ जावेद विश्वास चव्हाण, रा. नागझरी याची असुन तो कार सोडून पळुन गेल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावरुन सदर पोलीस स्टेशनचा अभिलेख तपासला असता त्या कालावधीत पोस्टे नेकनुर गुरनं 12/2021, कलम 379 भादवि, पोस्टे पेठ बीड गुरनं 11/2021, कलम 379 भादवि, पोस्टे धारुर गुरनं 08/2021, पोस्टे माजलगाव शहर गुरनं 14/2021, कलम 379 भादवि, गुरनं 23/2021, कलम 379 भादवि असे 05 गुन्हे दाखल आहेत असे निष्पन्न झाले. नमुद दोन महीला आरोपींकडुन पोस्टे नेकनुर, पोस्टे पेठ बीड, पोस्टे धारुर गुन्ह्यातील चोरी गेलेले दागिने किंमती 1,65,000/- रुपये चा माल व गुन्ह्यात वापरलेली वेरना कार किंमती 6,00,000/- रुपये असा एकुण 7,65,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सदर मुद्देमालासह दोन्ही महीला आरोपींना पोस्टे नेकनुर गुरनं 12/2021, कलम 379 भादवि मधये हजर केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे नेकनुर येथील पालीस उप निरीक्षक काळे हे करत आहेत. पोस्टे माजलगाव शहर गुरनं 14/2021 व 23/2021, कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेला मुद्देमाल व नमुद महीला आरोपींच्या इतर साथिदारांचा शोध चालु असुन नमुद महीला आरोपींकडुन आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीडचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.