#Social
संविधान हा भारताचा मौलिक ग्रंथ – अजिंक्य चांदणे
गेवराई दि. २६ – भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ट असुन मौलिक ग्रथं आहे. जगाच्या पाठीवरती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आम्हाला दिले असुन प्रत्येकाला समानतेची वागणूक व धर्मनिरपेक्ष असनारे मोलाचे संविधान या भारत देशाला अर्पण केले आहे. यात कुठलाही भेदभाव त्यांनी केला नाही म्हणूनच आपल्या देशात लोकशाहीचे राज्य असुन सर्वजन गून्यागोंविदाने राहतात असे प्रतिपादन डिपीआय चे प्रदेश अध्यक्ष तथा व्याख्याते अंजिक्य चांदणे यांनी केले आहे .
गेवराई शहरातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतिने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाची प्रस्ताविका लाऊन तसेच संविधानावर व्याख्याना कार्यक्रम येथील गटशिक्षण अधीकारी कार्यलयात पार पडला यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास पिसाळ , सय्यद एजाजोद्दीन अॅड भगवान कांडेकर , मोमिन , कंडूदास कांबळे , पिटी चव्हाण , अण्णासाहेब लोनके , अण्णासाहेब राठोड , बंडूभाऊ बारगजे , विनोद सौंदरमल , संजय सुतार , मनोहर चाळक , अॅड सुहाष निकम , संजय सुतार यांची उपस्तिथी होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात असा कोणताही देश नाही तिथले कायदे हिसंक आहेत. हाताच्या मोबदल्यात हात आणी जिवाच्या मोबदल्यात जिव असे वातावरण आहे. देशातली कांही ठराविक मंडळी हे संविधानात हस्तक्षेप करून संविधानाला नष्ट करायचे कुटील कटकारस्थान रचत आहे. परंतू आमचे सांगणे आहे अश्या वृत्तीला जोपर्यंत या देशातील तूमच्या आणी आमच्या सारखे संविधान प्रेमी जिवंत आहेत तो पर्यंत याचा अंजेडा आम्ही हानुन पाडल्याशिवाय राहनार नाहीत.
यावेळी शिवाजी डोंगरे , अजयकुमार पप्पू गायवाड , ऍड. सोमेश्वर कारके, सय्यद माजेद, आणा राठोड , बबु बारुदवाले, पि. एस. राऊत, रंजनी सुतार, अमोल सुतार , गोपाल चव्हाण, रंजीत शिंदे, अजय खरात, मुन्ना पाडमुखे, राजू गायवाड , बाबा घोडके, प्रा शरद सदाफूले, प्रा. हेमंत सौंदरमल, गौतम कांडेकर, बाबा निकाळजे, किशोर भोले, विशाल वक्ते, सतिष प्रधान यांच्यासह असंख्य संविधान प्रेमी उपस्थित होते.
दरम्यान संविधान प्रस्ताविकेचे तहसिलदार यांच्या हस्ते संविधानाच्या प्रस्ताविकेच्या फलकाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. गटविकास अधिकारी अनिरूद्ध सानप , गटशिक्षण अधिकारी मिंलीद तुरूकमारे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिल थोरात, कृषी अधिकारी राठोड, मंडळ अधिकारी तांबे, तलाठी पांढरे हे उपस्थित होते .