आरोग्य व शिक्षण
पहिली ते चौथी पर्यंतची शाळा भरणार दोनच महिने…….! काय म्हणाल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड…….?
डी डी बनसोडे
January 29, 2021
बीड दि. 29 – दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मागच्या दहा महिन्यांपासून शाळेला लागलेले टाळे उघडल्या जात आहेत. 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या तर 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा उघडल्या आहेत. त्यानंतर आता राज्याची परिस्थिती पाहून 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर पासून 9 वी ते 12 व 27 जानेवारी पासून 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू करण्यात आले. अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नसून आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू
करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (1 मार्च ते 30 एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.