#Online fraud
नांदेडमध्ये साडे चौदा कोटी रुपयांचा ऑनलाइन घोटाळा : तीन विदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात…….!
नांदेड दि.30 – नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेच्या ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी तीन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेल्या खात्यातून तब्बल साडे चौदा कोटी रुपये लांबवले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने केनियातील दोन तर युगांडाच्या एकाला अटक केली आहे. या तिघांना कर्नाटकातील धारवाड इथून पकडलं. तर हुबळी इथल्या एका तरुणीला याच प्रकरणात अटक केली आहे.
नांदेडमधील शंकर नागरी सहकारी बँकेतून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये रुपये संशयास्पदरित्या वळवण्यात आले होते. ही घटना 2 जानेवारी रोजी बँक व्यवस्थापनाला समजली. शंकर नागरी बँकेची शाखा नांदेड शहरातील आयडीबीआय बँकेजवळ आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार करुन या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली होती.