#Social
युवा उद्योजक पियूष शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा
अंबाजोगाई दि.६ – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक पियुश मच्छिंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रांनी व सहकार्यांनी आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला व त्यानुसार सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
पियुश मच्छिंद्र शिंदे यांनी सामाजिक कार्यात उडी घेतली असून उद्योग विश्वात देखील अल्पावधीत यश मिळविले आहे. त्याने केलेल्या कार्याचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक केले जात आहे. कारण एक 28 वर्षाचा तरूण आपल्या जीवनामध्ये वेगळे काही तरी करू शकतो. आणि अनेक सहकार्यांचा व तरूणांचा पोशिंदा होण्याच्या भूमिकेत राहतो ही नक्कीच नवतरूणाईला आदर्शवत वाटणारी बाब आहे. पियुश मच्छिंद्र शिंदे यांनी उद्योग विश्वात स्वतःचे नाव कोरले असून त्या सोबतच अंबाजोगाई शहराचे नाव देखील अखंड भारतभर पोहोंचविण्याचा प्रयत्न केला आहे. पियुश याने अंबाजोगाई शहरात अगरबत्तीचा कच्चा माल बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. त्याच्या कारखान्याच्या वतीने देशातील नामवंत व ब्रँडेड कंपनीला कच्चा माल पुरविण्यात येतो. त्याच्या या कार्याचे कंपनीने सुद्धा कौतुक केले आहे. अशा या तरूण तडफदार आणि कर्तृत्व संपन्न तरूणाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प त्याच्या असंख्य सहकार्यांनी केला. आणि त्यानूसार सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अंबाजोगाई शहरामध्ये अशिया खंडातले पहिले ग्रामिण रूग्णालय आहे. या ठिकाणी रूग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी रक्तदाब मशिन, नेपुलायझर मशिन, स्ट्रेचर व इतर साहित्य रूग्णालयास देण्यात आले. त्या सोबतच डॉ.प्रमोद बुरांडे यांच्या अॅक्टीव्ह लाईफ रूग्णालयात भौतिकोपचार रूग्ण तपासणी, उपचार, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात आले. या शिबीरात मान,पाठ,कंबर दुखी, मणक्याची गादी सरकणे, गॅप येणे, गुघडे आणि टाच दुखी, हातापायांना मुंग्या येणे, स्लिपडिस्क, सेरेब्रल, पाल्सी, वातामुळे होणारे त्रास ज्यामध्ये संधीवाद व आमवाद, शिर, स्नायू, आखडणे किंवा दुखणे, टेनिस यल्बो, फ्रोजन शोल्डर, अनेक दिवस बरी न होणारी जखम लखव्याच्या बाबतीतही या ठिकाणी उपचार करण्यात आले. ज्यामध्ये लिगामेट इंज्युरी, चेहर्याचा लकवा, रिस्त/फुट ड्रॉप, आखडलेले सांधे, स्पोर्टस् रिहॅब्लीटेशन, न्युरो अॅड ऑर्थो रिहॅब्लीटेशन, हाडांच्या/हृदयांच्या/मेंदु व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुर्ववत होण्यासाठीचे व्यायाम लहान मुलांनी वेळेवर मान न धरणे, बसता न येणे व चालता न येणे या बाबतीत डिलेड माईल्ड स्टोन यावरही उपचार करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन स्व.आलकाताई मच्छिंद्र शिंदे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात आले. या शिबीरात डॉ.प्रमोद बुरांडे व डॉ.सौ.पुजा प्रमोद बुरांडे यांनी रूग्णांच्या विविध आजारांवर उपचार करण्याचे काम केले. स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात स्वतः युवा उद्योजक पियुश शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.पुजा पियुश शिंदे हे हजर होते. या प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ.पवार, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.राकेश जाधव, डॉ.अमित लोमटे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लोमटे, पं.स.सदस्य तानाजी देशमुख, पत्रकार अतुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते शेख मुक्तार, विराज धिमधिमे, सय्यद बबलू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.