”ध” चा ”प” कधी कधी झाला?, ना. धनंजय मुंडेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा……!
बीड दि.७ – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचं मूळ गाव असलेल्या नाथरा गावात अनेक कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमावेळी बोलताना मुंडेंनी आपल्या भाषणात बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या.
माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करताना तुम्ही दिलेल्या प्रेमाने मला पुढील कामासाठीन नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यामुळे उतणार नाही मातणार नाही तुम्हाला दिलेला शब्द खाली पडू देणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. जगात कितीही कौतुक झाले सत्कार झाले आशीर्वाद मिळाले तरीही आपल्या मातीत आपला झालेल्या सत्काराची किंमतच करता येत नसल्याचं मुंडे आपल्या भाषणात म्हणाले.
दरम्यान, आपल्याला मिळणारी आमदारकी आणि जिल्हा परिषदेचं पद हे कसं मिळालं नाही. हे सांगताना मुंडेंनी राजकारणात ध चा प कसा झाला याचा उल्लेख जाहीरपणे भाषणात केला.