#Judgement

अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या रोडरोमिओला दहा वर्षांची सक्तमजुरी…..!

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई दि.१५ – आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला सोमवारी (दि.१५) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्या. सापटनेकर यांनी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. 
                चार वर्षापूर्वी परळी शहरात ही भयावह घटना घडली होती. सतीश वसंत मंत्रे असे त्या रोडरोमिओचे नाव आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली असता वाटेत सतीशने तिची छेड काढून जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या पिडीतेने झालेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी सतीशच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितले होते. त्यामुईल संतापलेल्या सतीशने पीडिता सकाळच्या वेळी शाळेत जात असताना तिला वाटेत अडवले. यापूर्वीची घटना तू घरी का सांगितलीस असे म्हणत तिला शिवीगाळ करत सोबत आणलेल्या चाकूने तिच्या पोटावर वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर रोडवर पडलेल्या पिडीतेच्या डोक्यात मारण्यासाठी त्याने मोठा दगड उचलला. परंतु, सतीश दगड मारणार तेवढ्यात तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडल्याने पिडीतेचा जीव वाचला. नागरिकांनी पिडीतेला तातडीने रुग्णालयात पाठविल्याने तिच्यावर वेळेत उपचार होऊ शकले. याप्रकरणी सतीश मंत्रे याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरिक्षक डी.बी. काळे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यालयात सादर केले.
                  या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर झाली. दोन्ही बाजूंची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सतीश मंत्रे यास दोषी ठरवून त्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील २५ हजार रुपये पिडीतेस नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अशोक कुलकर्णी यांनी काम पहिले. त्यांना ॲड. डी.डी. लांब आणि ॲड. एन.एस. पुजदेकर व पैरवी चौधर यांनी सहकार्य केले.
वेडाच्या भरात कृत्य केल्याचा बनाव…..! 
सदरील हल्ला सतीश मंत्रे याने वेडाच्या भरात केल्याचा बचाव सुनावणी दरम्यान करण्यात आला. परंतु, सतीशला बारावीला चांगले गुण मिळाले आहेत, तो नोकरी करतो, तसेच सोबत दोन मुली असताना त्याने फक्त पिडीतेवरच हल्ला केल्या. त्यावरून हे कृत्य त्याने जाणूनबुजून केले असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याआधारे न्यायालयाने सतीशचा बचाव फेटाळला आणि त्याला दोषी ठरवले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close