#Corona
आज केज तालुक्यात पाच नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्यात एकूण 37…….!
केज दि.१८ – राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे टेस्टिंग चे प्रमाण वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य विभागाने काळजी घेणे सुरू केले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या 446 कोरोना अहवालात जिल्ह्यात 37 रुग्ण बाधित आढळून आले असून केज तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाईत 17, आष्ठी 5, बीड 7, माजलगाव 1 तर परळीत 2 रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यात देशपांडे गल्ली 1, उंदरी 2, सोनी जवळा 1 तर डोक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.