महावितरणने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, 18 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत माहिती व सर्व तपशील वाचूनच अर्ज सादर करावेत. अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. तसेच भरण्यात येणाऱ्या पाच हजार पदांमध्ये सर्वसाधारण 1673, महिला 1500, क्रीडापटू 250, माजी कर्मचारी 750, प्रोजेक्टेड 250, भूकंपग्रस्त 99, शिकावू उमेदवार 500 पदे भरली जाणार आहेत.
दरम्यान या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण व नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट (एनटीटीसी) धारक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदावर ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत.