तोतया पोलिसाने केली महिलेची फसवणूक……..!
अहमदनगर दि.५ – बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटच्या मदतीने एका तोतया पोलिसाने महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा तोतया पोलीस बीड येथील रहिवाशी असून त्याने खोटी माहिती देवून आणि बनावट कागदपत्रं दाखवून एका महिलेशी शारिरीक संबंध ठेवले आहेत. पीडित महिलेला त्याच्याबद्दल संशय आल्यानंतर तिने त्याची कसून विचारपूस केल्यानंतर आरोपीचं बिंग फुटलं आहे. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला मारहाण करीत पळ काढला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत.
संबंधित व्यक्तिचं नाव किरण महादेव शिंदे असं असून तो बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी येथील रहिवाशी आहे. त्याने ‘मिशो’ अॅपच्या मदतीने महिलेशी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी खोट्या ओळखपत्रापासून ते बनावट कागदपत्रंही पाठवली आहेत. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने पीडितेशी अनेकदा शारिरिक संबंधही ठेवले. पीडित महिला विवाहित असून ती शिर्डी येथील रहिवाशी आहे. यामुळे आरोपीनेही आपण शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचं भासवून तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले आहेत. तसेच तुझ्या नवऱ्याला सोडून दे, मी तुला सुखात ठेवेल, असं अश्वासनही त्याने त्या महिलेला दिलं होतं. त्याचबरोबर शिर्डी पोलिसांत आपली चांगली ओळख आहे. त्यामुळे येथे तुला पोलिसाची नोकरी मिळवून देण्यात मदत करतो, असं आमिषही आरोपीने महिलेलं दाखवलं होतं.
दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे बनावट पोलिसाचं ओळखपत्र, पोलीस गणवेश आणि फोटो सापडले आहेत. याप्रकरणी राहाता पोलिसांनी आरोपी पोलीस किरण शिंदे याच्या विरोधात कलम 376, 419, 420, 170, 171, 323 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.