वडिलाचा मृतदेह दारात असताना लेकीने दिली परीक्षा…….!
पुणे दि.७ – बारावीच्या वर्गात गुणवत्ता यादीत आल्यानंतर मंगलने प्रतिकूल परिस्थितीतही सीए बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत सुरू केली. जेमतेम परिस्थिती असतानाही तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. मात्र हे सर्व सुरू असतानाच मंगलच्या वडिलांचे परीक्षे दरम्यान निधन झाले. मात्र तिचे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पित्याचा मृतदेह दारात असताना तिने मन घट्ट करून जिद्दीने परीक्षा दिली. तिच्या या धाडसाची प्रेरणा नुकतीच समोर आली आहे. प्रत्येकजण काही न काही तरी स्वप्न उरी बाळगतअसतो. मात्र ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणारे, झटणारे फार कमी लोक असतात. मात्र पुण्यारतील लोहियानगर या भागात राहणारी मंगल गायकवाड ही अपवादात्मक लोकांमधील आहे. मंगल सध्या (सीए) चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स करत आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यावर मात करून ती या कोर्सच्या अंतिम टप्प्यात आता पोहोचली आहे. ‘सलाम पुणे’नं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मंगलची प्रेरणादायीकथा सगळ्यांसमोर आणली आहे.
आजवर माझ्या घरच्यांनी जे भोगलं आहे त्यातून मला त्यांना बाहेर काढायचं आहे. चांगलं आयुष्य द्यायचं आहे, असं मंगलने म्हटलं आहे.
मंगलला बारावीतल्या गुणवत्तेमुळे 25 हजारांची शासकीय स्कॉलरशिप मिळाली. ती घेऊन तिनं पुढच्या परीक्षा दिल्या, क्लासेस केले. काही परीक्षांच्या क्लासेससाठी तिच्या काकांनी कर्ज काढलं मात्र तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.