31 मार्च पर्यंत नवीन नियमावली लागू…….!
मुंबई दि.१५ – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही 15 हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडलेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केलीय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आलीय. नव्या नियमावलीनुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल तर अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना उपस्थित राहता येणार आहे. ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट यांना 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारनं मुभा दिलीय. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहे. मास्क नसल्यास ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तापमान यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही.तर होम क्वारंटाईन व्यक्तींवर शासनाचा कोरोना स्टॅम्प असणं आवश्यक