देवगाव येथील सतीश लहु मुंडे ( वय २६ ) या तरुणास गावापासून जवळ असलेल्या दहिफळ माळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी बाबा जगन्नाथ मुंडे, रामदास उर्फ मिंटु जगन्नाथ मुंडे, पिप्या जगन्नाथ मुंडे या तिघांनी संगनमत करून तुझे कशाचे पैसे असे ? म्हणत शिवीगाळ करीत चापटा बुक्याने बेदम मारहाण केली. तर रामदास याने हातातील लोखंडी गज सतीश याच्या डोक्यात मारून डोके फोडत गंभीर दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. सदरील घटना १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. सतीश मुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबा मुंडे, रामदास उर्फ मिंटु मुंडे, पिप्या मुंडे या तिघा भावांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.