अगोदर घातला चपलेचा हार पुन्हा बांधले खुर्चीला अन त्याच अवस्थेत आणले बाहेर…….! आमदार आक्रमक…..!
जळगाव दि.27 – महावितरणाने महाराष्ट्रात वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे. शहरी भागात वीज बील न भरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तर आता ग्रामीण भागात देखील महावितरणाने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी सुरू केली आहे. यावरूनच जळगावातील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट महावितरण अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठत आधिकाऱ्यालाच चप्पलचा हार घालून खुर्चीला बांधले.
चाळिसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे काही शेतकऱ्यांसोबत एमआयडीसीच्या मुख्य कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले होते. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचं सांगितलं. यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण काम करत असल्याचे अधिक्षक अभियंत्याने उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने शेतकरी अधिकच संतप्त झाले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आमदारांनी आणि शेतकऱ्यांनी थेट अधिक्षक अभियंता अधिकाऱ्यालाच खुर्चीला दोरीच्या सहाय्याने बांधले. चप्पलचा हार या अभियंता अधिक्षकाला घालण्यात आला. त्यांना थेट त्याच बांधलेल्या अवस्थेत कॅबिनमधून मुख्य आवारात उचलून आणले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आधिकाऱ्याची सुटका केली.