#Corona
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण जास्त…….!
केज दि.१ – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. राज्यात दररोज 30 ते 35 हजारांच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. मात्र या लाटेत बालकांचेही प्रमाण लक्षणीय असून संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. परंतु असे जरी असले तरी पालकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात मागच्या महिन्यात कोरोनाच्या आकडेवारीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 10 वर्षाच्या आतील 15500 तर 11 ते 20 वर्षे वयोगटातील तब्बल 40 हजार मुलांना संसर्ग झाला आहे.
दरम्यान डॉ. तात्याराव लहाने यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत एका पासून तीन चार व्यक्ती बाधित होत होते मात्र या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण जास्त असून आता एक व्यक्ती किमान 10 ते 12 व्यक्तींना लागण होत असल्याचे दिसत आहे. तसेच मुलांना संसर्ग होत असला तरी घाबरून जाण्याचे कारण नसून घरातील व्यक्तींनी बाहेरून आल्यानंतर काळजी घेणे गरजेचे असून संक्रमण रोखले पाहिजे.