#Corona
केज शहरातील योगिता नर्सिंग होममध्ये कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सुरू…….!
केज दि.6 – दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा असलेल्या खाजगी दवाखान्यात ही कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून केज शहरातील योगिता बालरुग्णालयात दि.६ एप्रिल पासून पुन्हा कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली असून परिसरातील कोरोना रुग्णांची सोय होणार आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक उपचार मिळण्यासाठी सरकारी रुग्णालयात उपचार होत आहेत. मात्र या बरोबरच खाजगी रुग्णालयात ही कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रावधान आहे. आणि याच पार्श्वभूमीवर केज शहरातील डॉ.दिनकर राऊत यांच्या योगीता बालरुग्णालयाला जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आवश्यक अटी व नियमांचे पालन करून दि.२ ऑक्टोबर पासून कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु मध्यंतरी च्या काळात रुग्ण कमी झाल्याने सेंटर बंद करण्यात आले होते.
परंतु मागच्या कांही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने पूर्वी सेवेत असलेल्या योगिता नर्सिंग होमला पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्याने परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे. सदरील रुग्णालयाला 40 खाटांची मान्यता देण्यात आल्याची माहिती डॉ.दिनकर राऊत यांनी दिली.